मित्रांनो आपल्याकडे अनेक लोक दोन सिम कार्ड वापरत असतात—एक खासगी वापरासाठी तर दुसरे कामासाठी. मात्र अलीकडे सिम अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी नियमित रिचार्ज करणे बंधनकारक झाल्यामुळे वापरकर्त्यांवर आर्थिक बोजा वाढू लागला आहे. त्यामुळे अनेकांनी आपले दुसरे सिम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
जुलै महिन्यात टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅन्सचे दर वाढवले. यामुळे दुसरे सिम कार्ड केवळ एक्टिव्ह ठेवणेही आता महागडे झाले आहे. या पार्श्वभूमीवर ट्राय (भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण) ने एक नवीन नियम लागू केला आहे.
नवीन नियम काय सांगतो?
ट्राय कंझ्युमर हँडबुकनुसार जर एखादे सिम कार्ड सालाबादप्रमाणे ९० दिवसांपेक्षा जास्त काळ वापरले गेले नाही, तर ते निष्क्रिय मानले जाते. म्हणजेच, तीन महिन्यांनंतर सिम कंपनीद्वारे बंद केली जाऊ शकते.
पण जर त्या निष्क्रिय सिममध्ये काही बॅलन्स उपलब्ध असेल, तर सिम पुन्हा एक्टिव्ह करण्यासाठी वापरकर्त्यास ३० दिवसांची मुदत मिळू शकते. मात्र यासाठी २० रुपये शुल्क वजा केला जाईल. जर बॅलन्सच नसेल, तर सिम पूर्णपणे बंद होईल आणि त्याचा मोबाईल नंबर कंपनी इतर वापरकर्त्यांसाठी रीसायकल करेल.
१५ दिवसांची वाढीव संधी
तरीही, जर कोणी चुकून किंवा हेतुपुरस्सर सिम काही काळ वापरले नसेल, तर घाबरण्याची गरज नाही. सिम पुन्हा सुरु करण्यासाठी कंपनी १५ दिवसांचा अतिरिक्त कालावधी देते. वापरकर्ते यासाठी ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधू शकतात किंवा थेट कंपनीच्या स्टोअरमध्ये जाऊन सिम अॅक्टिव्ह करू शकतात.
ग्रामीण भारतासाठी महत्त्वाची घोषणा: राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशन २.०
याचवेळी संचार साथी नावाचे अॅप नुकतेच लाँच करण्यात आले असून, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशन २.० ची घोषणा केली. यामध्ये ग्रामीण भारतातील डिजिटल सुविधा वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.
या मिशनचे उद्दिष्ट
- २०३० पर्यंत २.७० लाख गावांमध्ये ऑप्टिकल फायबर नेटवर्क पोहोचवणे
- किमान ६०% ग्रामीण घरांमध्ये ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी
- शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, अंगणवाडी व पंचायत कार्यालये यांपैकी ९०% संस्थांना ब्रॉडबँड जोडणी देणे