शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील 64 लाख शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता 2555 कोटी रुपयांची विमा भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. विमा कंपन्यांना थकीत राज्य हिस्सा अनुदान म्हणून 2852 कोटी रुपये वितरित करण्यास सरकारने मान्यता दिली आहे.
मागील काही हंगामातील प्रलंबित भरपाई थेट शेतकऱ्यांच्या आधार-लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केली जाईल. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले की, विमा कंपन्यांना लवकरात लवकर या प्रक्रियेची पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना थेट लाभ मिळेल.
खरीप 2022 आणि रब्बी 2022-23 च्या हंगामासाठी 2.87 कोटी रुपये, 2023 च्या खरीप हंगामासाठी 181 कोटी रुपये, 2023-24 च्या रब्बी हंगामासाठी 63.14 कोटी रुपये आणि 2024 च्या खरीप हंगामासाठी 2308 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहेत.
महाराष्ट्रातील 64 लाख शेतकऱ्यांना एकूण 2555 कोटी रुपयांची विमा भरपाई मिळणार आहे. सरकारने विमा कंपन्यांना निधी वितरित केला आहे आणि ती रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.