नमस्कार मित्रांनो आज आपण आधार कार्डमध्ये झालेल्या नव्या आणि महत्त्वाच्या अपडेट्सबाबत माहिती घेणार आहोत. आधार कार्ड हा भारतीय नागरिकत्वाचा अत्यंत महत्त्वाचा पुरावा असून, अनेक सरकारी व खासगी कामकाजासाठी याचा उपयोग केला जातो. त्यामुळे आधार कार्ड वेळोवेळी अपडेट करणे आवश्यक असते. सध्या UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) ने आधारमध्ये एक नविन फीचर जोडले आहे – स्मार्ट फेस ऑथेंटिफिकेशन.
आधार कार्ड – का आहे महत्त्वाचे?
आजच्या डिजिटल युगात आधार कार्डशिवाय अनेक सरकारी योजना, बँकिंग सेवा, शिक्षण संस्था, तसेच विविध खात्यांचे व्यवहार करता येत नाहीत. कुठेही ओळख सादर करताना आधार कार्ड हा सर्वमान्य पुरावा मानला जातो. म्हणूनच, सरकार वेळोवेळी आधार कार्डशी संबंधित बदल करत असते.
नवीन अपडेट – स्मार्ट फेस ऑथेंटिफिकेशन
पूर्वी ओळख पटवण्यासाठी आधार कार्डाची हार्ड किंवा सॉफ्ट कॉपी दाखवावी लागत होती. मात्र आता, UIDAI ने एक स्मार्ट फेस ऑथेंटिफिकेशन फीचर सुरु केले आहे. या नव्या फीचरच्या मदतीने आधारधारकाचे फेस स्कॅनिंग करून त्याची ओळख पटवली जाईल. यासाठी तुम्हाला आधार कार्ड जवळ बाळगण्याची गरज भासत नाही.
सूचना व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या नव्या तंत्रज्ञानाची माहिती एका व्हिडीओद्वारे दिली आहे. हे फीचर UPI प्रमाणेच ओळख पडताळणीसाठी वापरले जाईल.
यामुळे होणारे फायदे
- आधार कार्डाची सॉफ्ट किंवा हार्ड कॉपी बाळगण्याची आवश्यकता नाही.
- ओळख पटवताना चेहऱ्याच्या आधारे त्वरित पडताळणी होणार.
- माहिती अधिक सुरक्षित – फेस ऑथेंटिफिकेशन हे डेटा गोपनीयतेच्या दृष्टीने सुरक्षित मानले जाते.
फेस ऑथेंटिफिकेशन कसे वापरावे?
1) तुमच्याकडे एक स्मार्टफोन असणे आवश्यक आहे.
2) NEW Aadhaar App डाऊनलोड करून इन्स्टॉल करा.
3) अॅपमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करा.
4) चेहरा स्कॅन करून ओळख पडताळणी करा.
सध्या हे फिचर बिटा टेस्टिंग टप्प्यात आहे, त्यामुळे सर्वसामान्यांसाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. पण लवकरच हे फीचर सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.
आधार कार्डमध्ये झालेला हा बदल तंत्रज्ञानाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. यामुळे नागरिकांची ओळख अधिक जलद, सोपी व सुरक्षित पद्धतीने पटवता येणार आहे.