मंडळी राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी केली आहे आणि त्यांना आता त्यांच्या युनिक आयडीसाठी अधिकृत संदेश मिळू लागले आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्ड कसे डाउनलोड करायचे? असा प्रश्न विचारला जात आहे. चला तर मग, या प्रक्रियेची सविस्तर माहिती घेऊया.
फार्मर आयडी कार्ड म्हणजे काय?
राज्य सरकारने अग्रिस्टॅक योजने अंतर्गत फार्मर आयडी कार्ड सुरू केले आहे. या कार्डाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जमीन माहिती, पिकांचे उत्पादन, बाजारभाव, मालकी हक्क आणि इतर शेतीसंबंधी माहिती एका ठिकाणी संकलित केली जाईल. भविष्यात शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड महत्त्वपूर्ण साधन ठरेल.
फार्मर आयडी डाउनलोड कसा कराल?
सर्वप्रथम तुम्ही https://apfr.agristack.gov.in/farmer-registry-ap/#/checkEnrolmentStatus ला भेट द्या. त्यानंतर आपला आधार क्रमांक प्रविष्ट करा. जर तुम्ही यापूर्वी नोंदणी केली असेल, तर आधार क्रमांक टाकल्यानंतर तुमची नोंदणी माहिती आणि युनिक फार्मर आयडी स्क्रीनवर दिसेल. सध्या, यामध्ये दुरुस्तीचा पर्याय नाही, त्यामुळे आधी दिलेली माहितीच दिसेल.
फार्मर आयडी PDF कशी डाऊनलोड करावी?
पुढे जाऊन, स्क्रीनवर दिसणाऱ्या View Details पर्यायावर क्लिक करा. तुमची संपूर्ण माहिती समोर दिसेल. वरच्या बाजूस Generate PDF किंवा Download PDF हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून तुमचा फार्मर आयडी PDF स्वरूपात डाउनलोड करा.