मित्रांनो लाडकी बहीण ही महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय योजना म्हणून ओळखली जाते. विधानसभा निवडणुकीनंतर या योजनेची चांगलीच चर्चा रंगली आहे. लाभार्थींना पुढील हप्ता कधी मिळणार, किती मिळणार आणि कोण पात्र ठरणार यावर विविध चर्चांना उधाण आलं असताना, आता या योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे – काही महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
एप्रिल महिन्याचा हप्ता आणि रक्कम
अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर एप्रिल महिन्याचा हप्ता लाभार्थींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. यावेळी २१०० रुपये नव्हे, तर नेहमीप्रमाणे प्रत्येकी १५०० रुपये जमा केले जातील. ज्यांचा मागील महिन्याचा हप्ता शिल्लक आहे, अशा महिलांना एकूण ३००० रुपये मिळण्याची शक्यता आहे.
९ लाख महिलांना योजनेतून वगळण्याची शक्यता
या योजनेतून सुमारे ९ लाख महिलांना अपात्र ठरवले जाण्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार नाहीत. योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांनाच मिळणार असून अपात्र ठरलेल्या महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळली जातील आणि त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत.
अपात्र ठरण्याची कारणं
- आयकर विभागाकडून लाभार्थ्यांची माहिती मागवण्यात आली आहे.
- चारचाकी वाहन धारक, वार्षिक उत्पन्न अडीच लाखांहून अधिक असलेल्या महिला योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत.
- ज्या महिलांचे लग्न महाराष्ट्राबाहेर झालं आहे आणि त्या परराज्यात स्थायिक झाल्या आहेत, अशा महिलांचे अर्जही नाकारले जातील.
- लाभार्थी महिलांचे महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवासी असणं अनिवार्य आहे.
- याशिवाय, संबंधित महिलांच्या नावावर किती जमीन आहे, याचीही पडताळणी केली जात आहे.