मंडळी महाराष्ट्र शासन अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबवत आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना विविध सुविधांसाठी १०० टक्के अनुदान दिले जाते. यामध्ये नवीन विहीर खोदणे, विहिरींमध्ये बोअरिंग करणे, शेततळ्यासाठी प्लास्टिक पन्नी, सूक्ष्म सिंचन व्यवस्था, पीव्हीसी पाइप्स आणि जुन्या विहिरींची दुरुस्ती यांचा समावेश आहे.
महत्त्वाचे म्हणजे, बोअरवेल देखील आता या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे, ज्यासाठी शेतकऱ्यांना ५०,००० रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते.
योजनेचे उद्दिष्ट
- शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे.
- सिंचन क्षमता वाढवणे.
- पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी आधुनिक पद्धतींचा अवलंब करणे.
- शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे.
पात्रता निकष
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- अर्जदार अनुसूचित जमातीतील असावा.
- कास्ट सर्टिफिकेट (जातीचा दाखला) आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न १.५ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- अर्जदाराच्या नावावर ७/१२ आणि ८अ उतारा असावा.
- किमान ०.४० हेक्टर जमीन अर्जदाराच्या नावावर असणे गरजेचे आहे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- जातीचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- ७/१२ आणि ८अ उतारा
- दारिद्र्यरेषेचे कार्ड (अंत्योदय किंवा बीपीएल)
- शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र
- पाणी उपलब्धतेचा दाखला (विहिरीसाठी)
- ०.४० हेक्टर शेती असल्याचा तलाठ्याचा दाखला
- ५०० फूट अंतरावर कोणतीही विहीर नाही, याचा प्रमाणपत्र
- कृषी अधिकाऱ्याचे क्षेत्रीय पाहणी शिफारसपत्र
- गटविकास अधिकाऱ्याचे शिफारसपत्र
- जागेचा फोटो
अर्ज कसा करावा?
1) महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी (Mahadbt) संकेतस्थळावर जा.
2) शेतकरी योजना या पर्यायावर क्लिक करा.
3) त्यानंतर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना निवडा.
4) आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा.
अधिक माहितीसाठी
- कृषी सहाय्यक किंवा
- सीएससी केंद्र (Common Service Center) येथे संपर्क साधावा.
शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेतीसाठी पाणीपुरवठा व्यवस्था सुधारावी आणि उत्पादन क्षमता वाढवावी.