मंडळी महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही एक अत्यंत उपयुक्त आणि लाभदायक योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विहिरी, बोअरवेल, शेततळे, मल्चिंग पेपर, सिंचनाची पाइपलाइन, तसेच जुन्या विहिरींची दुरुस्ती यासाठी १००% अनुदान दिलं जातं. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज महाडीबीटी पोर्टलवर सादर करावा लागतो, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
बोअरवेलसाठी अनुदान व त्याची माहिती
या योजनेअंतर्गत बोअरवेलसाठी ५०,००० रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते. त्यासाठी अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रे आणि पात्रतेचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
1) अर्जदाराचे आधार कार्ड
2) जातीचा दाखला (अनुसूचित जमातीसाठी)
3) उत्पन्नाचा दाखला
4) ७/१२ उतारा
5) दारिद्र्यरेषेखालील (BPL) कार्ड
6) १०० रुपयांच्या बाँडवर प्रतिज्ञापत्र
7) शेतात पाण्याचा स्रोत नसल्याचे तलाठ्याचे प्रमाणपत्र
पात्रतेचे निकष
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- अर्जदार अनुसूचित जमातीचा सदस्य असावा.
- वार्षिक उत्पन्न १.५ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- शेतकऱ्याच्या नावे किमान ०.४० हेक्टर क्षेत्र असावे.
ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर लवकरात लवकर अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा.