BSNL चा 150 रुपयांचा मस्त रिचार्ज प्लॅन …… जाणून घ्या सविस्तर माहिती

By News24

Published on:

Follow Us
bsnl new plan launch 150 rs

नमस्कार मित्रांनो भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ही देशातील एक प्रमुख टेलिकॉम कंपनी आहे. विविध किंमतीच्या श्रेणीत बीएसएनएल आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक रिचार्ज प्लॅन्स सादर करत असते. खाजगी कंपन्यांनी रिचार्ज दरवाढ केल्यानंतर, बीएसएनएलच्या किफायतशीर प्लॅन्समुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळत आहे. त्यामुळे बीएसएनएलच्या सेवा पुन्हा एकदा लोकप्रिय ठरत आहेत.

बीएसएनएलने नुकताच एक असा प्लॅन सादर केला आहे, ज्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया यांसारख्या खाजगी टेलिकॉम कंपन्यांसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. बीएसएनएलच्या विविध प्लॅन्समध्ये व्हॅलिडिटीसह आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, बीएसएनएलच्या तुलनेत खाजगी कंपन्यांकडे इतक्या मोठ्या कालावधीसाठी वैधता असलेले पर्याय नाहीत.

बीएसएनएलच्या प्लॅन पोर्टफोलिओमध्ये ३९७ रुपयांचा एक अत्यंत किफायतशीर रिचार्ज प्लॅन आहे. हा प्लॅन ग्राहकांसाठी उपयुक्त असून त्यात मोफत कॉलिंग, डेटा आणि एसएमएस यांसारख्या सुविधा मिळतात. या प्लॅनमध्ये एकूण १५० दिवसांची वैधता प्रदान केली जाते.

या ३९७ रुपयांच्या प्लॅन अंतर्गत ग्राहकांना पहिल्या ३० दिवसांसाठी सर्व नेटवर्कवर मोफत कॉलिंगची सुविधा मिळते. म्हणजेच प्लॅन सक्रिय केल्यानंतर पहिल्या ३० दिवसांसाठी ग्राहक मोफत कॉल करू शकतात. पन या कालावधीनंतर आउटगोइंग कॉल सुविधा बंद होईल, पण इनकमिंग कॉलची सेवा संपूर्ण १५० दिवसांसाठी सुरू राहील. याशिवाय या प्लॅनमध्ये ग्राहकांना पहिल्या ३० दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा प्रदान केला जातो, ज्यामुळे एकूण ६० जीबी डेटा वापरण्याची संधी मिळते.

या किफायतशीर प्लॅनमुळे बीएसएनएल पुन्हा एकदा ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे आणि स्पर्धात्मक बाजारात आपले स्थान बळकट करत आहे.

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.