मंडळी तुम्ही तुमचा जुना आधार कार्डचा फोटो बदलून फोटो सहजपणे अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत यानंतर तुमच्या आधार कार्डवरील फोटो बदलेल.
भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी आधार कार्ड हा एक अतिशय महत्त्वाचा डॉक्यूमेंट आहे. आजकाल कोणत्याही सरकारी किंवा खाजगी कामासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
आधार कार्डमधील जुना फोटो कसा बदलायचा ?
तुम्ही तुमच्या आधार कार्डमधील फोटो अगदी सोप्या पद्धतीने बदलू शकता. जुने आधार कार्ड बनवले गेले तेव्हा फोटोच्या गुणवत्तेकडे फारसे लक्ष दिले गेले नव्हते. अशा परिस्थितीमध्ये, आधार कार्डवर अनेक लोकांचा फोटो स्पष्ट दिसत नाही. अशा परिस्थितीत, तुम्ही आधार कार्डावरील फोटो बदलू शकता.
आधार कार्डचा फोटो कसा बदलायचा
आधार कार्डमधील फोटो बदलण्यासाठी, तुम्हाला सर्वप्रथम जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जा लागेल.
तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही त्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन अपॉइंटमेंट घेऊ शकता. जर तुम्ही आधीच अपॉइंटमेंट घेतली तर तुम्हाला लांब रांगेत उभे राहण्यापासून वाचता येईल.
तुम्हाला नोंदणी केंद्रावर जाऊन एक फॉर्म भरावा लागतो. तुम्हाला फॉर्म भरावा लागेल आणि तो संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करावा लागेल. यानंतर, तुम्ही दिलेल्या माहितीचे व्हेरिफिकेशन केले जाईल आणि तुमचा नवीन फोटो काढला जाईल.
तसंच फोटो बदलण्यासाठी तुम्हाला 100 रुपये इतके शुल्क भरावे लागेल. ही प्रक्रिया पूर्ण होताच, तुम्हाला एक acknowledgement slip (अपडेट केल्याची पावती ) मिळेल. त्यानंतर 90 दिवसांच्या आत तुमच्या आधार कार्डवर नवीन फोटो अपडेट केला जाईल.
तुम्हाला नवीन अपडेट केलेले आधार कार्ड पाहिजे असल्यास, तुम्ही पीव्हीसी किंवा डिजिटल आधार कार्ड सहजपणे डाउनलोड करू शकता. अपडेट केल्यानंतर, तुम्ही uidai.gov.in वर भेट देऊन नवीन फोटोसह आधार कार्ड डाउनलोड करू शकता.