आता ड्रायव्हिंग लायसन्स काढणे झाले सोपे , या प्रकारे भरा फॉर्म घरबसल्या …..

By News24

Published on:

Follow Us
driving license online form

नमस्कार मित्रांनो आता ड्रायव्हिंग लायसन घरबसल्या तयार होणार असून आरटीओ ऑफिस मध्ये आता अजिबात जायची गरज नाही.

ड्रायव्हिंग लायसन्स काढायचा असेल तर तुम्हाला आता ऑनलाईन अर्ज करून ड्रायव्हिंग लायसन  काढू शकता कारण आता सगळे 18 सर्विसेस ऑनलाईन झाले आहेत. तुम्हाला आरटीओ जायचे आता अजिबात गरज पडणार नाही आता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकता.

केंद्र सरकारने एक लेटर जाहीर केलेला आहे मिनिस्ट्री ऑफ रोड डिपार्टमेंट तसेच एक पत्रक राज्य सरकारने सुद्धा जाहीर केला त्याच्यामध्ये सुद्धा माहिती दिली आहे की आता ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ड्रायव्हिंग लायसन निघणार आहे

या राज्य पत्रामध्ये म्हटलं आहे की 03 मार्च 2020 रोजी हे जाहीर झालेला आहे हिंदी व इंग्लिश मध्ये संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली आहे.

यामध्ये आपल्याला सर्विस लाईव्ह होणाऱ्या 18 सर्विसेस ड्रायव्हिंग करताना मिळणार आहे यामध्ये काय काय भेटणार आहे त्याबद्दल जाणून घेऊया.

Apply Driving License Online

कोणतीही गाडी तुम्हाला चालवायची असल्यास, तुमच्याकडे गाडी चालविण्याचा परवाना (लायसन्स) असणे आवश्यक आहे. विना परवाना गाडी चालवणे हा कायद्याने गुन्हा मनाला जातो. पूर्वी ड्रायव्हिंग लायसन्स ऑफलाइन बनविले जात असे.

आता तुम्ही घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तर ऑनलाईन ड्रायविंग लायसन्स काढण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

1) https://sarathi.parivahan.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या आणि तुमचे संबंधित राज्य (State) निवडा.

2) लर्नर लायसन्स (learner license) मेनूवर नेव्हिगेट करा आणि नवीन शिकाऊ परवान्यासाठी अर्ज करा (Apply for a new learner license) हा पर्याय निवडा.

3) पडताळणीसाठी OTP जनरेट करण्यासाठी तुमचे आधार कार्डचे डिटेल्स व मोबाइल नंबर येथे लिहा.

4) आवश्यक माहितीसह शिकाऊ लायसन्ससाठी अर्ज फी भरा.

5) प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) येथे तुमच्या ड्रायव्हिंग टेस्टसाठी तारीख निवडा.

6) दिलेल्या तारखेनुसार, पडताळणी व प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांसह (आधार कार्ड, अर्ज, फी स्लिप) RTO कार्यालयाला भेट द्या.

7) चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला वाहन चालविण्याचा परवाना देण्यात येईल.

अर्ज करण्यासाठी इथे भेट द्या – https://sarathi.parivahan.gov.in/

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.