खाद्यतेल उद्यागाची केंद्र सरकारकडे मोठी मागणी , पहा सविस्तर माहिती

By News24

Published on:

Follow Us
Edible oil industry has a huge demand from the central government.

खाद्यतेल उद्योगात वजनाच्या वेस्टना विषयी (पॅकिंग) सुसुत्रता नाही. वेगवेगळ्या कंपन्या आपल्या सोयीनुसार ८००, ८१०, ८५०, ८७० ग्रॅम वजनाचे पॅकिंग करीत आहेत. त्यामुळे ग्राहकांमधील संभ्रम व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी २५०, ५०० आणि १००० ग्रॅममध्ये पॅकिंग करावे, अशी मागणी सॉल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (एसईए) ने केंद्र सरकारकडे केली आहे.

‘एसईए’ने या बाबत केंद्रीय ग्राहक कल्याण आणि नागरी पुरवठा विभागाच्या सचिव निधी खरे यांनी पत्र पाठविले आहे. या पत्रात म्हटले आहे, केंद्रीय ग्राहक कल्याण आणि नागरी पुरवठा विभागाने कोणाचीही मागणी नसताना २०२२ मध्ये खाद्यतेल कंपन्यांना आपल्या सोयीनुसार विविध वजनाचे पॅकिंग करण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे बाजारात विविध कंपन्यांनी आपल्या सोयीनुसार ८००, ८१०, ८५०, ८७० ग्रॅम वजनाचे पॅकिंग विक्रीस ठेवले आहे.

एका खाद्यतेल कंपनीने असे पॅकिंग केल्यानंतर व्यापारी स्पर्धेमुळे अन्य कंपन्यांनाही असेच पॅकिंग करावे लागते. हा चुकीचा प्रकार बाजारात पसरत चालला आहे. वेगवेगळ्या वजनाच्या पॅकिंगमुळे ग्राहकांचा संभ्रम होतो, आर्थिक नुकसान होते. त्यामुळे पूर्वी सारखेच २५०, ५०० आणि १००० ग्रॅममध्ये पॅकिंग करावे.

निर्णयात सुधारणेची गरज

विविध वजनांमधील पॅकिंगमध्ये बाजारात खाद्यतेल उपलब्ध आहे. एका कंपनीने आपल्या सोयीसाठी किंवा व्यापारी हितासाठी केले की, अन्य कंपन्यांनाही तसेच करावे लागते आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या पॅकिंगमध्ये एकत्रितपणा येण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या निर्णयात सुधारणा करण्याची गरज आहे, असे मत सॉल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (एसईए) अध्यक्ष भारत मेहता यांनी व्यक्त केले.

सॉल्व्हेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाची स्थापना १९६३ मध्ये झाली. भारतातील सॉल्व्हेंट एक्सट्रॅक्शन उद्योगाच्या विकास, सुसुत्रता आणि वाढीस मदत करण्यासाठी करण्यात आली. असोसिएशनमध्ये सध्या ८७५ सदस्य आहेत. ज्यात सुमारे ३५० कार्यरत सॉल्व्हेंट एक्सट्रॅक्शन प्लांट आहेत. ज्यांची एकत्रित ऑइलकेक/तेलबिया प्रक्रिया करण्याची वार्षिक क्षमता सुमारे ३० दशलक्ष टन इतकी आहे.

ही देशी खाद्यतेल उद्योगाची शिखर संघटना आहे. ही असोसिएशन ही देशातील एक अखिल भारतीय संस्था आहे जी सॉल्व्हेंट एक्सट्रॅक्शन उद्योग आणि प्रमुख वनस्पती तेल संघटना आहे ज्यामध्ये तांदळाचा कोंडा, तेलकेक्स, गौण तेलबिया आणि सोयाबीनचे प्रक्रिया करणारे व्यापक प्रतिनिधी सदस्य आहेत.

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.