मंडळी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे! जर तुम्हाला शेताच्या सुरक्षेसाठी तार कुंपण करायचे असेल, तर महाराष्ट्र शासनाकडून 90% अनुदान मिळू शकते. ही योजना वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
शेती करताना अनेक अडचणी येतात. अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ यासोबतच वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान ही मोठी समस्या आहे. हरणे, रान डुकरे, माकडे आणि नीलगाय या प्राण्यांमुळे उभे पीक उद्ध्वस्त होते, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तार कुंपण योजना सुरू केली आहे.
ही योजना कृषी विभागामार्फत राबवली जाते आणि पात्र शेतकऱ्यांना 90% अनुदान दिले जाते. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांचे पिकांचे संरक्षण करण्यास मदत करणे आणि उत्पादन वाढविणे आहे.
तार कुंपण योजनेसाठी आवश्यक अटी
शेतजमिनीवर कोणतेही अतिक्रमण नसावे.
वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक मार्गात असलेल्या जमिनींना लाभ मिळणार नाही.
ग्राम परिस्थितीत विकास समिती किंवा संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडून संमती आवश्यक आहे.
या योजनेसाठी 2 क्विंटल काटेरी तार आणि 30 लोखंडी खांब देण्यात येतात.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
सातबारा उतारा आणि गाव नमुना 8.
शेतकऱ्याचे आधार कार्ड.
ग्रामपंचायतीचा अधिकृत दाखला.
शेतीवर एकाहून अधिक मालक असल्यास संगती पत्र.
वन परीक्षेत्र अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र.
अर्ज कसा करावा?
सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा.
गावातील पंचायत समितीकडे जाऊन अर्ज सादर करा.
संवर्ग विकास अधिकारी किंवा पंचायत समितीमार्फत अर्ज स्वीकारला जाईल.
तपासणीनंतर आणि मंजुरी मिळाल्यानंतर लाभ मिळेल.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
जर ऑनलाइन अर्ज करणे शक्य नसेल, तर CSC केंद्रावर जाऊन अर्ज सादर करा.
योजनेचा शेतकऱ्यांना होणारा फायदा
वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण होते.
शेतीतील उत्पादन वाढते आणि आर्थिक नुकसान टळते.
ऊस, फळबाग, भाजीपाला आणि धान्य शेतीसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे.
तुमच्या शेतकरी मित्रांना ही माहिती शेअर करा, जेणेकरून ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.