मित्रांनो राज्यातील रेशनकार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या मोफत रेशन योजनेअंतर्गत नागरिकांना गहू आणि तांदूळ दिले जात आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने देखील आनंदाचा शिधा या योजनेद्वारे 100 रुपयांत पाच जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत.
पण अनेक लाभार्थ्यांना आता ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही, तर लाभार्थ्यांचे मोफत रेशन बंद होऊ शकते.
ई-केवायसीसाठी काही सोप्या पद्धती आहेत. लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानात जाऊन आधार कार्ड सोबत न्यावे आणि ई-पॉस (e-POS) मशीनवर अंगठ्याचा ठसा द्यावा. जर अंगठ्याचा ठसा जुळत नसेल, तर आयरिस स्कॅनरद्वारे डोळ्यांचा स्कॅन करूनही प्रक्रिया पूर्ण करता येते.
ऑनलाइन प्रक्रिया करण्यासाठी मोबाईलमध्ये मेरा ई-केवायसी हे एप डाउनलोड करावे. पण यासाठी आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. जर मोबाइल नंबर जोडलेला नसेल, तर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होणार नाही. शासनाने याशिवाय क्यूआर कोडचा पर्यायही उपलब्ध करून दिला आहे, ज्याचा वापर करूनही ही प्रक्रिया करता येते.
ई-केवायसी न केल्यास मोफत रेशन मिळणे बंद होईल. ही प्रक्रिया सोपी असून, ती स्वस्त धान्य दुकानात किंवा ऑनलाइन करता येते. जर कोणाला या प्रक्रियेत अडचण येत असेल, तर त्यांनी स्वस्त धान्य दुकानदार किंवा तहसील पुरवठा विभागाशी संपर्क साधावा. मोफत रेशन कायम ठेवण्यासाठी आजच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.