मंडळी आजच्या सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ झाली आहे. सलग पाच दिवस घसरण झाल्यानंतर आज किंचित वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांत सोन्याच्या दरात 1200 ते 1300 रुपयांची घट झाली होती. पण आता दरात थोडीशी सुधारणा झाली आहे.
मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचा दर 81,160 रुपये आहे, तर 24 कॅरेटसाठी 89,410 रुपये आणि 18 कॅरेटसाठी 67,060 रुपये इतका दर नोंदवला गेला आहे. नागपूरमध्येही हेच दर लागू आहेत.
नाशिक आणि लातूर येथे 22 कॅरेट सोन्याचा दर 81,190 रुपये, 24 कॅरेटसाठी 89,440 रुपये आणि 18 कॅरेटसाठी 67,090 रुपये इतका आहे.
पुणे, ठाणे, कल्याण, कोल्हापूर, जळगाव आणि सोलापूरमध्ये 22 कॅरेटसाठी 81,160 रुपये, 24 कॅरेटसाठी 89,410 रुपये आणि 18 कॅरेटसाठी 67,060 रुपये दर आहे.
वसई-विरार आणि भिवंडीमध्ये मात्र किंचित जास्त दर आहे. येथे 22 कॅरेट सोन्याचा दर 81,190 रुपये, 24 कॅरेटसाठी 89,440 रुपये आणि 18 कॅरेटसाठी 67,090 रुपये इतका आहे.
सोन्याच्या दरात ही वाढ जागतिक बाजारातील स्थितीनुसार झाल्याचे सांगितले जात आहे. दररोज सोन्याच्या किंमतीत चढ-उतार होत असतात, त्यामुळे गुंतवणूकदार आणि खरेदीदारांनी सद्यस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावा.