मंडळी या आठवड्याच्या सुरुवातीला दोन दिवसांतच सोन्याचा दर 1,360 रुपयांनी वाढला. मात्र त्यानंतर सलग काही दिवस घसरण झाली. दुसरीकडे, चांदीच्या किमतीत वाढ झाली असून ती पुन्हा लाख रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.
सोमवारी सोन्याचा दर 760 रुपयांनी, तर मंगळवारी 600 रुपयांनी वाढला. पण बुधवारी 490 रुपयांनी, तर गुरुवारी 330 रुपयांनी घसरला. त्यामुळे सध्या बाजारात सोन्याच्या दरात नरमाई दिसत आहे.
गुडरिटर्न्सच्या अहवालानुसार, 22 कॅरेट सोन्याचा दर 80,050 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 87,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
या आठवड्यात चांदीच्या किमतीत 2,100 रुपयांची वाढ झाली. सोमवारी आणि बुधवारी प्रत्येकी 1,000 रुपयांनी, तर गुरुवारी 100 रुपयांनी दर वाढला. मागील आठवड्यात चांदीत 5,000 रुपयांची घसरण झाली होती. गुडरिटर्न्सनुसार, 1 किलो चांदीचा सध्याचा दर 99,100 रुपये आहे.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या अहवालानुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 86,059 रुपये प्रति 10 ग्रॅम, 23 कॅरेट सोनं 85,714 रुपये, 22 कॅरेट 78,830 रुपये, 18 कॅरेट 64,544 रुपये, आणि 14 कॅरेट 50,345 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. एक किलो चांदीचा दर 96,724 रुपये झाला आहे.
वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कर आणि शुल्क नसल्याने दर तुलनेने कमी असतात. मात्र, सराफा बाजारात स्थानिक कर आणि शुल्क समाविष्ट असल्याने किंमतीत तफावत दिसते.
जर तुम्हाला ताज्या दरांची माहिती घ्यायची असेल, तर इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे दर जाहीर करते. हे दर शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्यांचे दिवस वगळता रोज अपडेट केले जातात. मोबाइलवर दर जाणून घेण्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास सर्व कॅरेटचे दर मिळू शकतात.
सोन्याच्या किमतीत सध्या चढ-उतार सुरू असून, मागील काही दिवसांत त्यात घसरण झाली आहे. तर, चांदीने पुन्हा वाढ घेतली आहे. आगामी काळात बाजारात कोणते बदल होतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.