मंडळी Jio कंपनीने आपल्या अनलिमिटेड ऑफरची वैधता वाढवली आहे. टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, कंपनीने ही ऑफर 30 एप्रिल 2025 पर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, ही ऑफर 31 मार्च 2025 रोजी समाप्त होणार होती, परंतु कंपनीने 15 एप्रिल 2025 पर्यंत तिची वैधता वाढवली होती. आता, 30 एप्रिलपर्यंत ऑफरचा विस्तार झाल्यामुळे, Jio वापरकर्त्यांसाठी हा एक आनंदाचा क्षण ठरला आहे, विशेषता IPLच्या सीझनमध्ये. Jio ने आपल्या वेबसाईटवर हे अपडेट केली आहे.
Jio च्या अनलिमिटेड ऑफरमध्ये Jio Hotstar चा 299 रुपये किंवा त्याहून अधिक किमतीच्या प्लॅनचा समावेश आहे. तसेच रोज किमान 1.5 GB डेटा वापरण्याची सुविधा देण्यात आली आहे. या ऑफरचा लाभ IPL चे चाहते विशेषता घेऊ शकतात.
Jio Hotstar सब्सक्रिप्शनसह काही परवडणारे प्लॅन
1)299 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. यामध्ये रोज 1.5 GB डेटा, 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय, Jio Hotstar चा फ्री एक्सेस देखील उपलब्ध आहे. तसेच, यामध्ये 50GB Jio AI क्लाऊड स्टोरेजसाठी सब्सक्रिप्शन मिळते.
2) 329 रुपयांचा प्लॅन
या प्रीपेड पॅकची वैधता 28 दिवसांची आहे. यामध्ये रोज 1.5 GB डेटा, 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. यामध्ये Jio Hotstar चा फ्री सब्सक्रिप्शन आणि 50GB Jio AI क्लाऊड स्टोरेज उपलब्ध आहे.
3) 349 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. यामध्ये रोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड 5G डेटा दिला जातो. तसेच, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 फ्री SMS देखील मिळतात. Jio Hotstar चा फ्री एक्सेस यामध्ये समाविष्ट आहे.
या नवीन प्लॅनसह, Jio ने आपल्या वापरकर्त्यांना अधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे, विशेषता IPLच्या आकर्षणात.