मंडळी महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य प्रदान करणे. या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
आतापर्यंतचे वाटप आणि एप्रिल हप्त्याची सुरुवात
सरकारकडून जुलै २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत एकूण २ कोटी ४१ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. योजनेअंतर्गत एप्रिल २०२५ महिन्याचा हप्ता २ मे २०२५ पासून जमा होण्यास सुरुवात झाली असून, पुढील २–३ दिवसांत सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
किती महिलांना किती रक्कम?
बहुतेक महिलांना योजनेच्या अंतर्गत नियमित १५०० रुपये प्राप्त होत आहेत. मात्र काहींना विविध कारणांमुळे खात्यात थेट ४५०० रुपये जमा झाले आहेत, तर काहींना केवळ ५०० रुपयेच मिळाले आहेत. यामागचे कारण म्हणजे काही महिला इतर योजनांचेही लाभार्थी आहेत – जसे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना किंवा नमो शेतकरी महोत्सव योजना. या दुहेरी लाभामुळे त्यांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा फक्त ५०० रुपयांचा हप्ता जमा करण्यात आला आहे.
४५०० रुपये कोणाला?
मार्च महिन्यात महिला दिनाच्या निमित्ताने सरकारने काही पात्र महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित हप्ता जमा केला होता. मात्र काहींच्या खात्यात एप्रिल आणि मार्चचे पैसे मिळाले नव्हते. अशा महिलांच्या खात्यात २ मेपासून ४५०० रुपये एकरकमी जमा करण्यात येत आहेत.