लाडकी बहीण योजना : या तारखेला मिळणार एप्रिल महिन्याचा हप्ता , तारीख पहा लगेच

By News24

Published on:

Follow Us
ladki bahin yojana april money

मंडळी राज्यात महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जात आहेत. जुलै 2024 पासून मार्च 2025 पर्यंत लाभार्थींना नियमितपणे हप्ते वितरित करण्यात आले आहेत. आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लाभार्थी महिलांना लागून आहे.

यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अक्षय तृतीयाच्या निमित्ताने म्हणजेच 30 एप्रिल रोजी एप्रिल महिन्याचा हप्ता लाभार्थींच्या खात्यात जमा केला जाणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या वर्षीचा अक्षय तृतीया सण ‘लाडक्या बहिणींसाठी’ खास आणि गोड ठरणार आहे.

महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, योजनेच्या लाभामध्ये पारदर्शकता राखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे.

योजनेअंतर्गत जवळपास ११ लाख अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, बनावट अर्जदारांना कोणताही आर्थिक लाभ वितरित करण्यात आलेला नाही, तसेच सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.