मित्रांनो एप्रिल महिना जवळ येत असताना लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत लाभार्थींमध्ये उत्सुकता आणि शंका आहे. अनेक महिलांच्या मनात प्रश्न आहे की एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार. यासंदर्भात अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. योजनेच्या अर्जांची तपासणी अद्याप सुरू असल्याने हप्त्याचे वितरण काही काळ लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
अर्जांची तपासणी प्रक्रिया
लाडकी बहीण योजनेसाठी सादर केलेल्या अर्जांची सध्या बारकाईने तपासणी सुरू आहे. यामध्ये लाभार्थी महिलांच्या चारचाकी वाहनांची तपासणी पूर्ण झाली आहे. अर्जदार महिलांचे वार्षिक उत्पन्न आणि इतर माहिती पडताळण्यासाठी परिवहन विभाग आणि आयकर विभागाची मदत घेतली जात आहे.
महिला व बालविकास विभागाने आयकर विभागाकडून 2.63 लाख लाभार्थी महिलांच्या उत्पन्नाची माहिती मागवली आहे. ही माहिती अद्याप विभागाला मिळालेली नाही. परिणामी, तपासणी प्रक्रियेत विलंब होण्याची शक्यता असून, अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.
हप्त्याचे वितरण कधी?
योजनेच्या अटींनुसार, ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. परंतु काही महिलांनी या निकषांचे उल्लंघन करून लाभ घेतल्याचे आढळले आहे. यामुळे अर्जांची तपासणी पूर्ण होईपर्यंत एप्रिल महिन्याचा हप्ता लांबणीवर पडू शकतो.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही स्पष्ट केले आहे की, अर्जांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच हप्त्याचे वितरण सुरू होईल. त्यामुळे लाभार्थींनी संयम बाळगावा आणि अधिकृत घोषणांची वाट पाहावी.