नमस्कार मंडळी लाडकी बहिणींसाठी सुरु केलेल्या लाडकी बहीण योजना बाबत एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जांची सखोल तपासणी सुरु झाली असून, अनेक महिलांचे अर्ज अपात्र ठरवले जाण्याची शक्यता आहे.
सध्या अर्ज पडताळणी प्रक्रिया सुरु असून, ती अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे उर्वरित अर्जांची तपासणी पुढील काही कालावधीत होणार आहे.
पडताळणीचे पाच टप्पे
या योजनेतील अर्जांची पडताळणी पाच टप्प्यांमध्ये केली जात आहे. सध्या कुटुंबाच्या उत्पन्नाची तपासणी बाकी आहे, जी लवकरच पूर्ण केली जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, अपात्र लाभार्थ्यांचे अर्ज थेट बाद केले जातील.
या कारणांमुळे अर्ज बाद
आत्तापर्यंत लाखो महिलांचे अर्ज अपात्र ठरवले गेले आहेत. यामध्ये खालील कारणे समोर आली आहेत.
- ज्या महिलांकडे चारचाकी वाहने आहेत.
- महाराष्ट्राबाहेरच्या रहिवासी असूनही बनावट कागदपत्रांच्या आधारे लाभ घेतलेल्या महिला.
या कारणांमुळे आतापर्यंत ९ लाखांहून अधिक अर्ज रद्द करण्यात आले असून, हा आकडा वाढत जाऊन तब्बल ५० लाख अर्ज बाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारचा स्पष्ट इशारा
राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, योजनेच्या अटींमध्ये न बसणाऱ्या महिलांना लाभ दिला जाणार नाही. ज्या महिलांचे अर्ज अपात्र ठरले आहेत, त्यांना यापुढे दरमहा मिळणारी १५०० रुपयांची रक्कम मिळणार नाही. काही महिलांना गेल्या दोन महिन्यांपासून पैसे मिळत नाहीत, कारण त्यांचे अर्ज आधीच बाद झाले आहेत.
उर्वरित महिलांची तपासणी लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.