मंडळी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्र महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत एप्रिल 2025 मध्ये पुढील हप्ता 6 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. मागील वर्षी सुरू झालेल्या या योजनेद्वारे महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जात आहे.
लाडकी बहीण कर्ज योजना
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतीच एक महत्त्वाची घोषणा केली आहे. यानुसार, लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना 50,000 रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे कर्ज महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा उदरनिर्वाहासाठी मदत करेल.
हप्त्यांची माहिती
योजनेचा लाभ महिलांना जुलै 2024 पासून मिळायला सुरुवात झाली असून आतापर्यंत 9 हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. यावेळी, एप्रिल महिन्याचा हप्ता देखील लवकरच खात्यात जमा होईल.
2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार?
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी 2,100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सध्या 1,500 रुपयेच दिले जात आहेत. अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे की, राज्याच्या आर्थिक परिस्थितीची सुधारणा झाल्यावर हा हप्ता 2,100 रुपये करण्यात येईल.
महिलांसाठी व्यवसाय संधी
योजनेच्या अंतर्गत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 20 महिलांचे गट तयार करून त्यांना प्रत्येकी 50,000 रुपये कर्ज देण्यात येईल. यामुळे गटाकडे 10 लाख रुपये भांडवल उपलब्ध होईल, ज्याचा वापर करून त्या महिलांना व्यवसायाची संधी मिळेल. याशिवाय, गटातील प्रत्येक महिलेचा मासिक उत्पन्न 30,000 रुपये पर्यंत पोहोचू शकतो.
अधिकृत संकेतस्थळावर अर्ज कसा करावा?
महिलांनी लाडकी बहीण योजना 2025 अंतर्गत कर्जासाठी किंवा हप्त्यासाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
ladakibahin.maharashtra.gov.in
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी लाडकी बहीण योजना एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. सरकारच्या या उपक्रमाचा लाभ घेऊन महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभारावा आणि आर्थिक प्रगती साधावी.