मित्रांनो महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सध्या राज्यात चांगलीच चर्चेत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीस आता १० महिने पूर्ण होत आले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. महायुती सरकारने लवकरच हा हप्ता वाढवून २१०० रुपये करण्याचे आश्वासनही दिले आहे. सध्या पर्यंत या योजनेचा लाभ सुमारे अडीच कोटी महिलांनी घेतला आहे.
अजूनही अर्ज करता येईल का?
लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्याची अंतिम तारीख आता पार पडली आहे. ही योजना जून २०२४ मध्ये सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२४ होती. त्यानंतर ती वाढवून १५ ऑक्टोबर २०२४ करण्यात आली. पण त्या तारखेनंतर अर्जप्रक्रिया बंद करण्यात आली आहे.
सध्या तरी या योजनेसाठी नवीन अर्ज स्वीकारले जात नाहीत. भविष्यात सरकारने यासंदर्भात काही नवीन निर्णय घेतल्यास, लाभ न मिळालेल्या महिलांना पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळू शकते. यासंबंधी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा किंवा चर्चा झालेली नाही.
एप्रिल महिन्याच्या हप्त्याची स्थिती
लाडकी बहीण योजनेचा एप्रिलमधील हप्ता कधी जमा होणार, याकडे अनेक महिलांचे लक्ष लागले आहे. मागील काही महिन्यांपासून हप्ता प्रामुख्याने महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा केला जात आहे. त्यामुळे एप्रिलचा हप्ता देखील महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे.