नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना महिलांसाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक अत्यंत लोकप्रिय योजना आहे. जुलै 2024 मध्ये सुरू झालेल्या या योजनेला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. याच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १,५०० रुपये मिळतात. आतापर्यंत या योजनेच्या अंतर्गत महिलांच्या खात्यात सहा हप्त्यांच्या स्वरूपात एकूण ९,००० रुपये जमा झाले आहेत.
अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू होणार
काही महिलांनी उशिरा अर्ज केला किंवा अर्ज न करता या योजनेचा लाभ घेतला नाही. अशा महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे – पुढील आर्थिक वर्षात महिलांना दर महिन्याला २,१०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनंतर अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू होईल, परंतु यासाठी काही महिन्यांची प्रतीक्षा लागू शकते.
आधार आणि बँक खाते लिंक करणे आवश्यक
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अनिवार्य आहे. राज्यातील १२ लाख महिलांचे आधार आणि बँक खाते लिंक नसल्यामुळे त्यांना योजनेचे पैसे मिळवण्यात अडचणी येत होत्या. मात्र, डिसेंबर २०२४ पर्यंत आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणाऱ्या महिलांना ९,००० रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
अर्ज प्रक्रियेसाठी महिलांनी काय करावे?
1) आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे सुनिश्चित करा.
2) अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यावर योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा जवळच्या केंद्रावर अर्ज सादर करा.
3) गरज असल्यास स्थानिक प्रशासनाकडून मदत घ्या.
नवीन महिलांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार असल्याने, या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना आवश्यक असलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.