मंडळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र शासनाची महिलांसाठी सुरू केलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात मागील वर्षी शिंदे सरकारने मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर केली होती. या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
या योजनेचा लाभ जुलै 2024 पासून सुरू झाला असून, आतापर्यंत जुलै ते मार्च 2025 या कालावधीत एकूण 9 हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. यामध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 तसेच जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2025 हे महिने समाविष्ट आहेत.
विशेष म्हणजे, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ जागतिक महिला दिनानिमित्त (8 मार्च 2025) एकत्रितरित्या म्हणजेच 3,000 रुपये या दिवशी जमा करण्यात आले होते.
एप्रिल हप्त्याबाबत साशंकता
योजना सुरू झाल्यापासून महिलांनी वेळेवर हप्त्याचा लाभ घेतला आहे, मात्र सध्या एप्रिल 2025 महिन्याच्या हप्त्याबाबत काहीच स्पष्टता नाही. पूर्वी अशा चर्चा होत्या की, अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर एप्रिलचा हप्ता मिळेल. पण आता एप्रिल महिना संपत आला असून, तरी अद्याप पैसे जमा झालेले नाहीत.
या संदर्भात महिलांमध्ये नाराजी वाढली आहे. मंत्रिमंडळातील आदिती तटकरे यांनी एप्रिल महिन्याचा लाभ एप्रिल संपण्यापूर्वी मिळेल असे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही. त्यामुळे एप्रिलचा हप्ता उशिराने मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जर एप्रिल महिन्यात लाभ मिळाला नाही, तर मे महिन्यात एप्रिल आणि मेचे एकत्रित 3,000 रुपये जमा होतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे या योजनेतील पुढील निर्णयाकडे लक्ष लागून आहे.