नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता म्हणजेच ₹2,000 रूपये दिनांक 2 एप्रिलपासून थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आला आहे. राज्यातील तब्बल 93.26 लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.
पण अनेक शेतकऱ्यांना अजूनही हे समजत नाही की त्यांच्या खात्यात पैसे आले आहेत की नाहीत. यासाठी सरकारने एक ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे, ज्याद्वारे आपण घरबसल्या, आपल्या मोबाईलवरून सहजपणे हे तपासू शकता.
नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला का? जाणून घेण्यासाठी पुढील सोपी पद्धत वापरा
1) अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://nsmny.mahait.org/
2) Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा.
3) आपला आधार लिंक असलेला मोबाईल नंबर Enter Mobile Number या ठिकाणी टाका.
4) खाली दिलेला कॅप्चा कोड भरावा.
5)ओटीपी (OTP) मोबाईलवर येईल, तो टाका.
6) Get Data या बटणावर क्लिक करा.
7) त्यानंतर तुम्हाला पुढील गोष्टींची माहिती मिळेल:
- आतापर्यंत मिळालेले सर्व हप्ते
- कोणता हप्ता कुठल्या बँकेत आणि कोणत्या दिवशी जमा झाला
- सध्या सुरू असलेला (उदा. सहावा) हप्ता जमा झाला आहे की नाही
- जर हप्ता मिळालेला नसेल, तर काय अडचण आहे याची माहिती
ही प्रक्रिया खूपच सोपी आहे आणि घरबसल्या मोबाईलवरून करता येते. त्यामुळे तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे ₹2,000 जमा झाले आहेत की नाही, हे तुम्ही सहज तपासू शकता.
ही माहिती आपल्या शेतकरी मित्रांनाही जरूर शेअर करा, जेणेकरून तेही आपली स्थिती तपासू शकतील.