मंडळी महाराष्ट्रातील एकूण 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना नमो शेतकरी योजनेंतर्गत मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने या योजनेच्या सहाव्या हप्त्याची रक्कम, एकूण 2,169 कोटी रुपये, थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 31 मार्चपूर्वी जमा करण्याची घोषणा केली आहे.
नमो शेतकरी योजनेचा हप्ता मोबाईलवरून सहज तपासता येतो. यासाठी अधिकृत संकेतस्थळ https://nsmny.mahait.org/ येथे भेट द्यावी. त्यानंतर Beneficiary Status (लाभार्थी स्थिती) या पर्यायावर क्लिक करून आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर व कॅप्चा कोड भरावा. मोबाईलवर आलेला OTP टाकून Get Data या बटनावर क्लिक केल्यावर हप्त्याची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल. यामध्ये कोणत्या तारखेला कोणत्या बँकेत किती पैसे जमा झाले याचा तपशील मिळेल. तसेच आतापर्यंत मिळालेल्या हप्त्यांचा संपूर्ण तपशील आणि हप्ता न मिळाल्यास त्यामागील कारणे देखील येथे पाहता येतील.
केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये लाभार्थ्यांच्या आधार व डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केली जाते.
राज्य सरकार देखील केंद्राच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवत आहे. या अंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये मिळतात. शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी आल्यास आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू केंद्रावर संपर्क साधावा.