अती मुसळधार पावसाचा इशारा ! या जिल्ह्यात पडेल मुसळधार पाऊस

By News24

Published on:

Follow Us
orange rain alert in this discricts

भारतात पुन्हा एकदा हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार 50 ते 60 किमी वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे.

आयएमडीने दिलेल्या इशार्‍यानुसार पुढील दोन दिवस पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. पुढील 48 तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राजस्थानमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला असून, हवामान विभागानं जारी केलेल्या इशाऱ्यानुसार राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये या काळात जोरदार वारं वाहणार असून, तापमान 34 अंश सेल्सिअस पर्यंत राहणार आहे. तर झारखंडमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार विदर्भात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना आज येलो तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

अमरावती, वाशिम, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना येलो अलर्ट, तर यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सध्या नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे.

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.