शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 2852 कोटी पीक विम्याचे जमा , यादीत नाव चेक करा

By News24

Published on:

Follow Us
pik vima 2852 rs deposit

नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तब्बल काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शासनाने पीक विमा मंजुरीचा निर्णय घेतला आहे. आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होणार असून, यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

किती रक्कम जमा होणार आणि कोणत्या हंगामासाठी?

महाराष्ट्र सरकारने 2023 पासून रखडलेली आणि यंदाच्या खरीप हंगामातील विम्याची रक्कम एकत्र करून जवळपास ₹2555 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामध्ये खालील हंगामांचा समावेश आहे.

  • खरीप 2022
  • रब्बी 2022-23
  • खरीप 2023
  • रब्बी 2023-24

या योजनेअंतर्गत लाखो शेतकऱ्यांना थेट फायदा होणार असून, शासनाने यासाठी नवीन जीआरदेखील काढला आहे.

पात्र कोण आणि किती शेतकऱ्यांना मिळणार आहे लाभ?

खरीप 2024 मध्ये राज्यभरातून 1 कोटी 71 लाख अर्ज आले होते. त्यापैकी 1 कोटी 65 लाख अर्ज वैध ठरले. मात्र विविध कारणांमुळे फक्त 64 लाख शेतकरीच विमा भरपाईसाठी पात्र ठरले आहेत.

पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ₹2308 कोटी विमा रक्कम लवकरच जमा होणार आहे.
(जर तुमचा अर्ज फेटाळला गेला असेल, तर कारण जाणून घेणे महत्त्वाचे आहे.)

विमा कंपन्यांचे योगदान काय आहे?

भारतीय कृषी विमा कंपनी ही या योजनेची प्रमुख समन्वयक संस्था आहे. शासनाने विमा कंपन्यांना ₹2852 कोटींचे अनुदान मंजूर केल्यानंतर, त्यांनीही रक्कम वितरणाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता खरीप 2023 आणि 2024 मधील विमा रक्कम थेट खात्यात जमा होणार आहे.

तुमचा पीक विमा जमा झाला का? अशी करा तपासणी.

1) https://pmfby.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
2) Farmer Corner वर क्लिक करा.
3) Login Farmer वर क्लिक करून मोबाईल नंबर टाका.
4) OTP मिळवा आणि सबमिट करा.
5) वर्ष आणि हंगाम निवडा.
6) तुम्ही भरलेल्या पॉलिसी दिसतील.
7) View Status वर क्लिक करून रक्कम आली का, किती आली आणि कोणत्या तारखेला आली, याची सविस्तर माहिती मिळवा.

एक महत्त्वाची सूचना

ज्यांनी खरीप 2024 साठी अर्ज केला आहे, त्यांनी आपले बँक खाते तपासत राहावे. कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच विम्याची रक्कम जमा होणार आहे.

शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा…

पीक विमा ही योजना संकट काळात तुमचं आर्थिक संरक्षण करत असते. त्यामुळे योग्य वेळेत अर्ज करा, अपडेट तपासत रहा आणि शासकीय वेबसाईटवरूनच अधिकृत माहिती मिळवा.

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.