मंडळी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महाराष्ट्राला ६ लाख ३६ हजार ८९ घरकुल उपलब्ध करून दिली गेली होती. या योजनेतील काही अटी आणि निकष गरीब लोकांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्यात अडचणी ठरल्या होत्या. त्यानंतर या निकषांना शिथिल करून, या वर्षी महाराष्ट्रासाठी २० लाख घरकुल मंजूर करण्यात आले आहेत. केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याबाबत माहिती दिली आहे.
महायुती सरकारच्या सत्तेवर येताच, केंद्र सरकारकडून राज्याला मोठे गिफ्ट मिळाले आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महाराष्ट्रासाठी एका वर्षात २० लाख घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या घोषणेनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल माहिती दिली.
सर्व बेघरांना मिळणार लाभ
एका वर्षात २० लाख घरकुलांना मंजुरी देण्यात आले आहे. याचा लाभ सर्व बेघर व्यक्तींना मिळणार आहे. विशेषता शेतकऱ्यांना आणि महिलांना हक्काचे घर मिळवून देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, यामुळे शेतकऱ्यांना आणि महिलांना त्यांच्या हक्काच्या घरांचा लाभ मिळणार आहे.
पंतप्रधान आवास योजनेतील काही निकष शिथिल करण्यात आले आहेत. पूर्वी ज्यांना फोन किंवा दुचाकी होती, त्यांना घरकुल मिळत नव्हते. आता या अटी रद्द केल्या आहेत, त्यामुळे फोन किंवा दुचाकी असलेल्यांनाही घरकुल मिळणार आहे. याशिवाय पूर्वी कुटुंबाचे मासिक उत्पन्न १० हजार रुपये असलेल्यांना योजनेत समावेश केला जात नव्हता. आता ही मर्यादा १५ हजार रुपये प्रतिमहिना केली आहे. तसेच पाच एकर कोरडवाहू आणि अडीच एकर बागायती शेती असलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे, असे शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले.