मंडळी पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेचा १९ वा हप्ता गेल्या महिन्याच्या २४ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. आता शेतकरी २० व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा हप्ता वेळेवर मिळावा यासाठी काही महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.
देशातील अनेक शेतकरी अजूनही शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळवू शकत नाहीत. अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकारने २०१९ मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम दर चार महिन्यांनी २,००० रुपयांच्या हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
आतापर्यंत या योजनेचे १९ हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. आता २० व्या हप्त्यासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांनी काही महत्त्वाची कामे पूर्ण करणे आवश्यक आहे.
सरकारने शेतकऱ्यांसाठी आधीच सूचना दिल्या आहेत की, ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. तरीही अनेक शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही. जर शेतकऱ्यांनी २० व्या हप्त्यापूर्वी ई-केवायसी केले नाही, तर त्यांचा हप्ता अडकू शकतो.
ई-केवायसी करण्यासाठी, शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ ला भेट द्यावी. त्यानंतर, Farmers Corner विभागातील e-KYC या पर्यायावर क्लिक करावे. येथे आधार क्रमांक टाकून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी.
शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून २० वा हप्ता त्यांच्या खात्यात वेळेवर जमा होईल. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे.