मंडळी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम दर चार महिन्यांनी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत 18 हप्ते वितरित झाले असून, आता 2025 सालातील 19 वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. लाभार्थ्यांनी खात्री करून घ्यावी की त्यांचे नाव यादीत आहे की नाही. अन्यथा, ते या हप्त्यापासून वंचित राहू शकतात.
सरकारने अलीकडेच काही नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार, जर शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या अटींचे पालन केले नसेल, तर त्यांचा पुढील हप्ता रोखला जाऊ शकतो. सर्वप्रथम, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही प्रक्रिया शेतकरी pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर OTP द्वारे किंवा जवळच्या CSC केंद्रात बायोमेट्रिक द्वारे करू शकतात. मोबाईल अॅपवरून फेस ऑथेंटिकेशन द्वारे देखील ई-केवायसी करता येते.
जर शेतकरी अल्पभूधारक असतील, तर त्यांनी आपली जमीन व मालकीची पडताळणी जिल्हा कृषी कार्यालयात किंवा भूमी अभिलेख विभागात करून घ्यावी. अर्ज करताना जर कोणतीही चूक झाली असेल, जसे की चुकीचा बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, किंवा इतर माहिती, तर देखील हप्ता अडकण्याची शक्यता असते. बँक खात्याशी आधार लिंक नसेल, तर तेही अडचणीचे कारण ठरू शकते.
शेतकऱ्यांनी वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण करून आपली माहिती अपडेट ठेवणे गरजेचे आहे, जेणेकरून पुढील हप्ता वेळेत प्राप्त होईल. अधिक माहिती किंवा मदतीसाठी शेतकरी पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकतात – 18001155266, 155261, 011-24300606 आणि इतर अधिकृत नंबर.