प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत सरकारने केला मोठा बदल , जाणून घ्या सविस्तर माहिती

By News24

Published on:

Follow Us
pm kisan yojna new rules changes

मंडळी जर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचे लाभार्थी असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशातील कोट्यवधी शेतकरी या योजनेच्या 20व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. हा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप त्यासाठीची निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

दरम्यान सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा बदल केला आहे. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर काही आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून, त्यामुळे लाभ मिळण्यात अडचण येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुलभता निर्माण झाली आहे. योजनेअंतर्गत आता प्रत्येक जिल्ह्यासाठी एक विशेष नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे जर कोणत्याही कारणामुळे शेतकऱ्यांना हप्ता प्राप्त होत नसेल, तर त्यांना काळजी करण्याची गरज नाही.

शेतकरी या नोडल अधिकाऱ्यांशी मोबाईल नंबर किंवा ई-मेलच्या माध्यमातून थेट संपर्क करू शकतात. ही माहिती ऑनलाइन सहज मिळू शकते. त्यासाठी सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

तिथे Farmer Corner या विभागात Search Your Point of Contact (POC) या पर्यायावर क्लिक करून, आपले राज्य आणि जिल्हा निवडल्यावर संबंधित नोडल अधिकाऱ्यांची सविस्तर माहिती मिळते. उदाहरणार्थ जर तुम्हाला महाराष्ट्रातील किंवा सोलापूर जिल्ह्यातील नोडल अधिकाऱ्यांची माहिती हवी असेल, तर तशी निवड करून शोध घेता येतो.

या बदलांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणी निवारणासाठी अधिक प्रभावी मार्ग उपलब्ध झाला आहे.

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.