नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अत्यंत चर्चेत राहिलेली आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. यापूर्वीही सरकारने अनेक सामाजिक योजना राबवल्या आहेत, परंतु लाडकी बहिण योजना विशेष लोकप्रिय ठरली आहे.
याशिवाय स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना देखील राबवली जात आहे. याअंतर्गत पहिल्या मुलीवर समाधान मानणाऱ्या पालकांना ५०,००० रुपयांचे अनुदान दिले जाते. तसेच, लेक लाडकी योजना अंतर्गत मुलीच्या अठराव्या वर्षीपर्यंत ७५,००० रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर आता श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट तर्फे श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना सुरू करण्यात येत आहे. न्यास व्यवस्थापन समितीने या योजनेस मंजुरी दिली असून ती लवकरच कार्यान्वित होणार आहे. या योजनेचा उद्देश मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, त्यांचे शिक्षण आणि सक्षमीकरण यासाठी आर्थिक सहाय्य पुरवणे हा आहे.
योजनेचा तपशील
- श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर आणि राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या बालिकांच्या नावाने १०,००० रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट त्यांच्या मातांच्या खात्यावर ठेवण्यात येईल.
- न्यास व्यवस्थापन समितीने या अभिनव योजनेस मंजुरी दिली असून ती लवकरच संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार आहे.
- शासनाच्या मान्यतेनंतर या योजनेसाठी आवश्यक निकष जाहीर केले जातील.
याशिवाय श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट सामाजिक उपक्रमांतही सक्रिय आहे. गरजू रुग्णांसाठी वैद्यकीय आर्थिक सहाय्य, गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत पुस्तके उपलब्ध करून देणे, तसेच डायलिसिस केंद्राच्या माध्यमातून रुग्णांना मदत करण्यासारखे समाजोपयोगी उपक्रम ट्रस्ट राबवत आहे.
महिला दिनानिमित्त विशेष उपक्रम
महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये ८ मार्च, जागतिक महिला दिनाच्या दिवशी जन्मलेल्या नवजात बालिकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबविण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे.
या उपक्रमामुळे राज्यातील कन्या सक्षमीकरणास नवी दिशा मिळेल आणि सामाजिक परिवर्तनाला चालना मिळेल.