मंडळी सध्या देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. अनेक उच्चशिक्षित तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरू केली आहे. या योजनेत बेरोजगार तरुणांना कामाचा अनुभव मिळावा आणि त्यांना आर्थिक मदत व्हावी, हा उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना प्रति महिना ५,००० रुपये दिले जातील. त्यापैकी ४,५०० रुपये केंद्र सरकारकडून मिळतील, तर उर्वरित ५०० रुपये संबंधित उद्योग किंवा आस्थापनेतून दिले जातील. याशिवाय, इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर तरुणांना ६,००० रुपये अनुदान देखील दिले जाणार आहे.
या योजनेत आणखी एक महत्त्वाची सुविधा देण्यात आली आहे. जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या बेरोजगार व्यक्तीला या योजनेत सहभागी करून घेतले, तर त्याला ५,००० ते १०,००० रुपयांपर्यंत बोनसही मिळू शकतो.
ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे. विशेषतः जालना जिल्ह्यातील तरुणांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२५ निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी त्याआधी अर्ज भरावा.
या योजनेसाठी पात्रता ठरवताना काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. उमेदवाराने १० वी, १२ वी, पदवी किंवा ITI पूर्ण केलेले असावे. अर्ज करताना वय २१ ते २४ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच, अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असावे आणि घरातील कोणतीही व्यक्ती शासकीय नोकरीत नसावी.
योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असून, इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी pminternship.mca.gov.in या लिंकला भेट द्यावी.
ही योजना बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा.