नमस्कार मित्रांनो राज्यात मागील सात-आठ दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, अनेक भागांत गारपीटही झाली आहे. ऐन काढणीच्या काळात आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अंदाज जाहीर केला असून, आगामी काळात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
डख यांच्या अंदाजानुसार, 06 एप्रिलपासून राज्यातील तापमानात मोठी वाढ होणार असून, काही भागांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. या काळात शेतकऱ्यांनी पाळीव प्राण्यांची व स्वतःची विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
तसेच 14 एप्रिलनंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता असल्याने, कांदा, हळद आणि इतर काढणीला आलेली पिके 14 एप्रिलपूर्वीच काढून घ्यावीत, असे डख यांनी सुचवले आहे.
06 एप्रिल ते 14 एप्रिलदरम्यान कडक उन्हाचा अनुभव येईल, तापमान झपाट्याने वाढेल, त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्य तितक्या लवकर पीक काढणीचे काम पूर्ण करावे. डख यांनी सांगितले की, हा हवामान अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पुढील नियोजन करावे.