तुमचे नाव मतदार यादीत आहे का ? या प्रकारे चेक करा अवघ्या दोन मिनिटांत

By News24

Published on:

Follow Us
voting list check online

नमस्कार मित्रांनो तुमचे नाव मतदार यादीत आहे का ? दोन मिनिटांत तुम्ही चेक करू शकता त्याबद्दल अधिक माहिती आज जाणून घेऊया

भारताचा प्रत्येक नागरिक मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र आहे, पण त्यासाठी मतदार यादीत नाव असणे गरजेचे आहे. तुमचे नाव मतदार यादीत असल्याचे खात्री करायचे असेल तर, आता तुम्ही ते घरबसल्या अगदी सोप्या पद्धतीने दोन मिनिटांत चेक करू शकता.

मतदार यादीत नाव तपासण्याची पद्धत

1) राष्ट्रीय निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाइट वापरा

https://voters.eci.gov.in/ या लिंकवर क्लिक करुन National Voter Service Portal च्या अधिकृत वेबसाईटवर जा.

2) मुख्यपृष्ठावर Search in Electoral Roll किंवा मतदार यादीत नाव शोधा हा पर्याय निवडा.
तिथे तुम्हाला दोन पर्याय उपलब्ध आहेत

3) EPIC क्रमांक वापरून नाव शोधा

4) तुमच्या मतदार ओळखपत्रावरील EPIC क्रमांक टाका.

5) सामान्य तपशील वापरून शोधा

6) तुमचे पूर्ण नाव, राज्य, जिल्हा, विधानसभा क्षेत्र यासारखी माहिती प्रविष्ट करा.

7) यानंतर Search बटणावर क्लिक करा.

8) जर तुमचे नाव मतदार यादीत असेल, तर ते स्क्रीनवर दाखवले जाईल.

नाव चेक करण्याची दुसरी पद्धत

1) मतदार यादी तपासण्यासाठी मोबाईल अ‍ॅप वापरा

2) राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे अधिकृत Voter Helpline App डाउनलोड करा.

3) अ‍ॅप उघडून Search Your Name in Electoral Roll हा पर्याय निवडा.

4) माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमची नोंद स्क्रीनवर दिसेल. Search Name in Voter list

5) SMS च्या माध्यमातून चेक करा

काही राज्यांमध्ये एसएमएसच्या मदतीनेही मतदार यादीतील नाव तपासता येते. यासाठी, EPIC क्रमांक टाकून दिलेल्या क्रमांकावर एसएमएस पाठवा. यासंदर्भातील माहिती NVSP किंवा राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

एसएमएसद्वारे मतदार यादीत नाव शोधण्याची पद्धत

1) तुमच्या मतदार ओळखपत्राचा EPIC क्रमांक शोधा. हा क्रमांक तुमच्या मतदार ओळखपत्रावर (Voter ID) स्पष्टपणे नमूद असतो.

2) तुमच्या मोबाईलच्या मॅसेज अ‍ॅपवर जा आणि खालील स्वरूपात एसएमएस टाइप करा:

3) EPIC <तुमचा EPIC क्रमांक> या फॉर्मॅटमध्ये sms करा

4) हा एसएमएस 1950 किंवा संबंधित निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या क्रमांकावर पाठवा.

5) काही सेकंदांमध्ये तुम्हाला तुमच्या नोंदीची माहिती परत मिळेल. त्यामध्ये खालील तपशील समाविष्ट असेल

Search Name in Voter list

1) मतदाराचे नाव

2) मतदार केंद्राचे नाव

3) विधानसभा क्षेत्र

4) इतर महत्त्वाची माहिती भरा

नाव नाही सापडले तर काय कराल ?

जर तुमचे नाव मतदार यादीत सापडत नसेल, तर घाबरू नका.

1) नोंदणी करा NVSP वेबसाइट किंवा Voter Helpline App वर नवीन मतदार नोंदणी करा.

2) फॉर्म 6 भरा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा).

3)प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती बघता येईल.

मतदार यादीतील नोंद

मतदार पत्रावर दिलेली माहिती मतदार यादीशी संलग्न असते. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.

मतदार पत्र नसल्यास येणारे अडथळे

1) मतदानाचा हक्क गमवावा लागू शकतो.

2) ओळखीचा वैध पुरावा नसल्यामुळे विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवणे कठीण होते.

3) बँकिंग आणि सरकारी कागदपत्रांच्या कामांमध्ये अडचणी निर्माण होतात.

मतदार ओळखपत्र केवळ मतदानासाठीच नाही तर तुमच्या ओळखीचे आणि अधिकारांचे प्रतीक आहे. जर तुमच्याकडे मतदार पत्र नसेल, तर NVSP किंवा Voter Helpline App च्या माध्यमातून ते त्वरित अर्ज करून तयार करा.

तुमच्या अधिकारांचा उपयोग करा व जबाबदार नागरिक बना

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.