हवामान विभागाकडून मोठा इशारा : आता मुसळधार पावसापेक्षाही मोठे संकट , पहा सविस्तर माहिती

By News24

Published on:

Follow Us
weather new update for people

मित्रांनो मागील काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये वातावरणात मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे, पूर्व आणि मध्य भारतात उन्हाचा कडाका वाढलेला असून, प्रचंड उष्णता जाणवत आहे, तर दुसरीकडे उत्तर भारत व इतर काही राज्यांमध्ये पाऊस थांबण्याचं नाव घेत नाहीये, पुन्हा एकदा आयएमडीकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आज पुन्हा एकदा राजधानी दिल्लीमध्ये पावसाने हजेरी लावली. दिल्लीच्या अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू झाला आहे. त्यानंतर आता उत्तर पूर्वेकडील राज्यांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान सध्या देशावर दोन प्रकारचे संकट पाहायला मिळत आहे. काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे, तर काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे.

ओडिशा, झारखंड व पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होणार असून, उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या तीन राज्यांमध्ये पुढील तीन दिवस खूप जास्त उकाडा जाणवणार आहे. या पार्श्वभूमीवर येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. येथील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या देखील पुढे जाऊ शकतं असं हवामान विभागाने म्हटलं आहे.

दुसरीकडे गिलगिट बाल्टिस्थान, लडाख, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, आसाम, नागालँड, मणिपूर आणि मिझोरममध्ये पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला जात आहे.

गुजरात, तेलंगणा व आंध्र प्रदेशमध्ये देखील तापमानात सरासरीपेक्षा अधिक वाढ होईल असा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान सध्या देशावर दुहेरी संकट बघायला मिळत आहे, एकीकडे उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होणार आहे, तर काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.