नमस्कार मित्रांनो राज्यातील महायुती सरकारने 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना मोठ्या चर्चेचा विषय ठरली होती. या योजनेविषयी विरोधकांनी वेळोवेळी टीका केली असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून सरकार स्थापन झाल्यास लाभार्थींना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र या आश्वासनाच्या अंमलबजावणीसंबंधी निश्चितता अद्याप नसल्याचे चित्र आहे.
विरोधकांचा असा दावा आहे की, काही लाभार्थींना फक्त 500 रुपयेच मिळणार आहेत. त्यामुळे सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. अशा परिस्थितीत एप्रिल महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार, याकडे राज्यातील लाभार्थी महिलांचे लक्ष लागून आहे.
अदिती तटकरे यांची माहिती
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी यासंदर्भात एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर माहिती दिली होती. त्यांच्या माहितीनुसार.
- 28 जून व 3 जुलै 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये सन्मान निधी दिला जात आहे.
- ज्या महिलांना इतर योजनांमधून 1500 रुपयांपेक्षा कमी रक्कम मिळते, त्यांना उर्वरित फरक भरून दिला जातो.
- नमो शेतकरी सन्मान योजना अंतर्गत दरमहा 1000 रुपये मिळणाऱ्या 7,74,148 महिलांना उर्वरित 500 रुपये सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहेत. एप्रिल 2025 चा हप्ता कधी मिळणार?
योजनेच्या निकषांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता अक्षय्य तृतीयेला लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना वेगळ्या आहेत. महिलांनी आपल्या गरजेनुसार एखादी योजना निवडावी. जर 1500 रुपये हवे असतील, तर इतर योजना स्वीकारू नयेत.
आधीचे हप्ते
फेब्रुवारी आणि मार्च 2025 महिन्यांचे हप्ते 07 मार्च ते 12 मार्च 2025 या कालावधीत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. त्यामध्ये प्रत्येकी 1500 रुपये असे एकूण 3000 रुपये दोन टप्प्यांत वितरित झाले.